मुंबई : करिना कपूर, अर्जुन कपुर स्टारर 'की एन्ड का' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमातला की अर्थातच लडकी म्हणजेच मुलगी एक वर्किंग वुमन आहे तर की एन्ड कामधला 'का' जी व्यक्तिरेखा अर्जुन कपूरनं साकारली आहे एक हाउस हसबंड असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बल्की यांचे सिनेमे कायम नेहमी पेक्षा जरा हटकेच असतात. त्यांचा 'की एन्ड का' हा सिनेमा आज बिग स्र्कीनवर पहायला मिळतोय. करिना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर या सिनेमात हाउस हसबंड सारखा एक वेगळा विषय हाताळण्यात आलाय.  ही गोष्ट आहे कबीर आणि कियाची. दिल्लीच्या एक फ्लाइट दरम्यान या दोघांची भेट होते.. मग प्रेम होतं आणि मग लग्न.


या दोघांचा स्वभवही अगदी contrast असतो. कीया आपल्या कामाबाबतीत एक अत्यंत पॅशनेट मुलगी असते इनशॉर्ट ती एक कॉरपोरेट रोबो असते तर कबीर अर्थातच 'का'ला आपल्या आई सारखं व्हायचं असतं. त्याच्या मते घरातलं काम करणं, जेवण करणं ही एक प्रकारे कला आहे, ज्यात त्याला खूपच रस असतो. सो तो एक हाउस हसबंड होवून घर साभाळतो तर दुसरीकडे कीया आपलं ऑफिस.


काही दिवसांनी या दोघांच्या सुखी संसारात अनेक चढ उतार येतात.. मग काय घडतं.. अशा काहीशा बॅकग्राउंडवर आधारित या सिनेमाची गोष्ट आहे. खरं तर सिनेमा पाहतान अभिमान या सिनेमाचीही आठवण झाल्याशिवाय राहत नाही.. 
सिनेमाचा पूर्वार्ध चांगला झालाय. एंटरटेनिंग वाटतो पण सिनेमाचा उत्तरार्ध फसलाय.. खरं सिनेमाची कथा खूपच मजेशीर आहे पण त्याची मांडणी भरकटली आहे..


हे सगळे फॅक्टर्स पाहता मी की एन्ड का या सिनेमाला देतेय 3 स्टार्स..