सुंदर दिसण्यासाठी किम कार्दशियन करते इतका खर्च
रिऍलीटी टीव्ही स्टार किम कार्दशियन सुंदर दिसण्यासाठी दिवसभरात १२३० युएस डॉलर म्हणजेच ८२,१४० रुपये इतका खर्च करते.
लॉस एंजेलिस : रिऍलीटी टीव्ही स्टार किम कार्दशियन सुंदर दिसण्यासाठी दिवसभरात १२३० युएस डॉलर म्हणजेच ८२,१४० रुपये इतका खर्च करते. इतक्या रुपयांचं मेक अपचं सामान किमला एका दिवसासाठी लागतं.
अमेरिकेतील मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये किमनं याबाबतचा खुलासा केला आहे. रोज सकाळी मी 'ला मेर'च्या चार उत्पादनांचा नियमीत वापर करते. यामध्ये द फरफॅक्टिंग ट्रीटमेंट(२४० डॉलर), द कॉन्सन्ट्रेट(४४० डॉलर), द रिनीवल ऑल(२४० डॉलर) आणि क्रीम दे ला मेर(३१० डॉलर) यांचा समावेश आहे.
३५ वर्षांची किम दिवसाच्या सुरवातीलाच चेहऱ्याला ज स्क्रब आणि पील वाईप्सनं साफ करते. ब्रिटनमध्ये याची किंमत सहा पाऊंड इतकी आहे.