मुंबई : कोलकात्याचा १७ वर्षीय कुशल पॉल सिंगीग रिअॅलिटी शो सा रे गा मा पाचा विजेता ठरला. रविवारी या शोचा ग्रँड फिनाले झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सा रे गा मा पाचा रॉकस्टर अशी ओळख बनलेला कुशल गायक आणि संगीतकार प्रीतम यांच्या टीममध्ये होता. 


जिंकल्यानंतर कुशाल म्हणाला, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला इतके मोठे यश मिळेल. त्याच्यासाठी ही ट्रॉफी जिंकणे आयुष्यातील ध्येय होते. 


सा रे गा मा पामध्ये जिंकल्यानंतर कुशालला ट्रॉफी आणि ह्युंदाय ईलाईट आय-२० बक्षीस म्हणून देण्यात आली. 


कुशालला त्याचा लहानपणीचा स्टार ऋतिक रोशनसाठी गाण्याची इच्छा आहे.