मुंबई : बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानला जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा तो विमानाने आला की रेल्वेने हा प्रश्न विचारला गेला तेव्हा याचं उत्तर देत असतांना त्याने एक आश्चर्यकारक घटना सांगितली.


शाहरुखने म्हटलं की, 'त्या दिवशी जी घटना घडली ती माझ्यासाठी हैरान करणारी गोष्ट होती. ज्या ट्रेनने मी मुंबईला येत होतो ती मुंबईत आल्यानंतर लोकल ट्रेन बनते हे मला माहित नव्हतं. माझं रिझर्वेशन होतं तर मी माझ्या सीटवर दुसऱ्याला का बसू दिलं असतं. मी लोकांना बसू देत नव्हतो. फक्त एका महिलेला मी माझ्या सीटवर बसू दिलं.'  


शाहरुख पुढे म्हणतो की, 'मी लोकांना म्हटलं की माझ्या बर्थवर दुसऱ्याला का बसू देऊ त्यानंतर त्या महिलेने माझ्या कानाखाली लगावली आणि म्हटली की ही बर्थ तुझ्या एकट्याची नाही तर सर्वांची आहे. अशा प्रकारे माझं मुंबईत स्वागत झालं.'