पाहा, प्रीती झिंटाच्या विवाहाचा रोमान्टिक साक्षीदार!
`दिल चाहता है` म्हणणाऱ्या प्रीती झिंटानं गुपचूपपणे अमेरिकेत विवाहबद्ध होणं पसंत केलंय. लॉस एन्जेलिसमध्ये तिचा विवाह जिन गुडएनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत पार पडलाय.
मुंबई : 'दिल चाहता है' म्हणणाऱ्या प्रीती झिंटानं गुपचूपपणे अमेरिकेत विवाहबद्ध होणं पसंत केलंय. लॉस एन्जेलिसमध्ये तिचा विवाह जिन गुडएनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत पार पडलाय.
प्रीतीनं अगदी खाजगीरित्या हा विवाह केल्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांची निराशा झालीय. या विवाहसोहळ्यासाठी जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं.
प्रीती आणि गुडएनफचा विवाह हिंदू परंपरेनुसार पार पडला. यासाठी भव्य मंडपही सजवण्यात आला होता. याच मंडपाचा एक फोटो सोशल वेबसाईटवर सध्या वायरल होताना दिसतोय. मलहॉलंड ड्राईव्ह, बेवर्ली हिल्सच्या भागात हा रोमान्टिक मंडप उभारण्यात आला होता.
गुडएनफ आहे आणि तो प्रीतीहून १० वर्षांनी लहान आहे. बॉलिवूड वर्तुळातून ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान आणि सुरीली गोयल या विवाहसोहळ्यात दाखल झाल्याचं समजतंय.