मुंबई: सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे अभिेनेता आमिर खान आणि स्टार टीव्ही गोत्यामध्ये आलं आहे. या कार्यक्रमावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिेकवर उत्तर द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं या दोघांनाही सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यमेव जयते हा शब्द भारताचं एम्ब्लेम आहे आणि त्याचा वापर करणं हे स्टेट एम्ब्लेम ऍक्टच्या विरोधात आहे, असं सांगत मनोरंजन रॉय यांनी याचिका दाखल केली होती. 


दरम्यान सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे कोणत्याही कायद्याचा भंग झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र केंद्रीय गृहविभागानं दिलं आहे. असं असलं तरी उद्या कोणी हे एम्ब्लेम किंवा वाक्य वापरलं तरी सरकारची हिच भूमिका असणार का, असा सवाल न्यायाधिशांनी विचारला आहे. याप्रकरणी 20 एप्रिलला सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे. 


तसंच आमिर खान आणि स्टार टीव्हीनंही याबाबत 20 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. सत्यमेव जयते हा कार्यक्रम 2012 आणि 2014 मध्ये स्टार टीव्ही वर प्रसारित झाला होता.