मुंबई : झी युवा महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव घेऊन येणार आहे. युवा पिढीशी संबंधित कथा, आजच्या तरुण पिढीचे त्यांच्या मित्र- मैत्रिणींशी, कुटुंबाशी असलेले नातेसंबंध आधुनिक पध्दतीने दाखविण्याचा प्रयत्न झी युवा करणार आहे. झी युवावरील अशीच एक उत्साहपूर्ण आणि जोशपूर्णमालिका‘लव्ह लग्न अनं लोचा’चे शीर्षक गीत नुकतेच डिजीटल माध्यमातून प्रसिध्द झाले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे तुफान गाजत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल दोन लाख नऊ हजार लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. यामालिकेचे संगीत बिपीन जानवलेकर आणि विशालयांनी केले असून गाण्याचे बोल विशाल यांनीच लिहिले आहेत. विशाल यांनी याआधी युथ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. हे शीर्षक गीत सक्षम कुलकर्णी जो मालिकेमध्ये (विनय नागपूरकर), ओंकार गोवर्धन–(सुमित सरदेसाई), विवेकसांगळे–(राघव लव्हेकर), श्रीकर पित्रे–(अभिमान सावंत),सिद्धी कारखानीस–(शाल्मली सुर्वे सावंत), रुचिता जाधव–(काव्या कामत) आणि समीहा सुळे–(आकांक्षा परब) यांच्यावर चित्रित आहे.


शीर्षक गीताच्या शब्द रचनेमध्ये स्वच्छंदपणा, प्रेम, तरुणाईचा बिनधास्त– बेधुंदपणा आहे, तर संगीत बेभान करणारे आहे. गाण्याच्या शब्दांमधून तसेच चित्रीकरणामधून प्रत्येक पात्राचे, त्यांच्या स्वभावाचे वर्णन अतिशय सुंदर प्रकारे केले आहे. कथासूत्र न सांगता मालिकेतील पात्रं कशी आहेत हे, या गाण्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 


‘लव्ह लग्न अनं लोचा’मालिकेच्या नावावरूनच काहीतरी भन्नाट बघायला मिळणार आहे. मालिकेत तरुणाईची तत्वं, दोस्ती-यारी, भावना, त्यांचे जुगाड, प्रेम आणि त्यांच एक वेगळचं जग दाखविण्यात आले आहे. ह्यामालिकेमध्ये आजच्या तरुण पिढीच्या प्रेमापासून सुरु झालेला प्रवास, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रेम, मैत्री ते लग्न आणि त्यातून होणारे लोचे, आई-वडिलांच्या इच्छा, स्वप्नं, मुलाचं लग्न करून देण्याची घाई ह्या सगळ्या गोष्टींचं गंमतीशीरपणे पण प्रत्येकाला आपलसं वाटेल असं चित्रण केले आहे.


पाहा व्हिडिओ