मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा काल प्रदर्शित झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल २१.३० कोटी रुपयांची कमाई केली. या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरलाय.


सुशांतसिंग राजपूतची मुख्य भूमिका असेलल्या या सिनेमाबाबत समीक्षकांनीही चांगली मते व्यक्त केली होती. खेळाच्या मैदानावर धुंवाधार बॅटिंग कऱणारा धोनी बॉक्स ऑफिसवरही दमदार बॅटिंग करतोय. नीरज पांडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. 


सुल्ताननंतर पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा धोनीचा चित्रपट ठरलाय.