मुंबई : चला हवा येऊ द्या सेटवर नुकतीच मधु इथे अन् चंद्र तिथे या आगामी चित्रपटाची टीम आली होती. यावेळी नेहमीप्रमाणेच सेटवर निलेश साबळे आणि टीमने एकच धमाल उडवून दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान, म्युझिक लाँचचाही सोहळा झाला. यावेळी आनंद इंगळे, अंकुश चौधरी हे कलाकार उपस्थित होते. या शोदरम्यान भाऊने मजामस्तीमध्ये अंकुश चौधरीला मी ओळखतो हा तर जॉन अब्राहम असे म्हटले. 


भाऊच्या या वाक्यावर अंकुश चौधरी आणि आनंद इंगळे उठले आणि भाऊला मजामस्तीमध्ये मारण्यास सुरुवात केली. शोदरम्यान ही सर्व धमाल सेटवर सुरु होती.