मुंबई : आजही 'धक धक गर्ल' माधुरीला नव्या भूमिकेत बघायला तिचे चाहते उत्सुक आहेत. बॉलिवूडची हीच 'तेजाब' गर्ल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर अनेक वर्षांनी माधुरीने 'आजा नचले' सिनेमातून कमबॅक केला होता... पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र माधुरी मध्यवर्ती भूमिकेत असली तरी ती दिसणार आहे एका आईच्या भूमिकेत...

याआधीही माधुरीला एका सिनेमात सोनम कपूरच्या आईच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण ही भूमिका करण्यास माधुरीने नकार दिला होता. आता माधुरीला आलिया भट्टची 'आई' बनण्याची ऑफर मिळालीय.

आलिया भट्ट, वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'शिद्दत' या चित्रपटात माधुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटातून माधुरी पहिल्यांदाच एका 'आई'च्या भूमिकेत दिसू शकेल. आता ती ही भूमिका स्वीकारणार का नाही? याच्या उत्तराकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष राहील.

दिग्दर्श अभिषेक वर्मनच्या या चित्रपटाचं अगोदर 'कलंक' असं नामकरण करण्यात आलं होतं... पण, नंतर या चित्रपटाचं नाव बदलून 'शिद्दत' असं करण्यात आलंय.