`डार्क चॉकलेट`फेम महिमाची एक्स बॉयफ्रेड लिएंडर पेसवर आगपाखड
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा `डार्क चॉकलेट` नावाचा बंगाली थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा 'डार्क चॉकलेट' नावाचा बंगाली थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय.
'डार्क चॉकलेट' हा सिनेमा शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. या सिनेमात महिमानं इंद्राणी मुखर्जी हिची भूमिका निभावलीय.
लिएंडर पेसवर आगपाखड
या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं बऱ्याच दिवसांनी मीडियासमोर आलेल्या महिमाला एक्स बॉयफ्रेड लिएंडर पेसबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा लिएंडरनं आपल्याला फसवल्याचं स्पष्टपणे महिमानं म्हटलं.
लिएंडर एक चांगला टेनिस खेळाडू आहे पण एक माणूस म्हणून तो अजिबात चांगला नसल्याचं महिमानं म्हटलंय. दोघे जेव्हा संबंधात होते तेव्हा त्याच्या आसपास अजूनही एखादी व्यक्ती असल्याचं महिमाला समजलं तेव्हा तिला धक्काच बसला... परंतु, या धक्क्यामुळे आपण आणखीनच मॅच्युअर्ड झाल्याचं महिमा म्हणतेय.
इतक्यावरच महिमा थांबली नाही... लिएंडरनं आपल्यासोबत जे केलं तेच तो त्याची सध्याची पत्नी रिया पिल्लई हिच्यासोबतही करेल, असंही तिनं म्हटलंय.
जेव्हा गरज होती तेव्हाच सोडली लिएंडरनं साथ
महिमा आणि लिएंडरचं प्रेम प्रकरण जाहीर झालं होतं. पण, हे प्रेम प्रकरण कधीच लग्नापर्यंत पोहचलं नाही. 2006 साली महिमानं मुंबईचा आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याच्यासोबत विवाह केला. त्यानंतर काही महिन्यांनीच महिमानं एका मुलीला जन्म दिला. 2013 मध्ये बॉबी आणि महिमा यांचंही नातं तुटलं.
बॉ़लिवूडमध्ये पुन्हा परतणार
1997 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या महिमानं शाहरुख खानसोबत 'परदेस' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर काही सिनेमांत काम केल्यानंतर 2006 सालापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली होती. 'सिंगल मदर' असल्यानं हा वेळ आपली मुलगी अरियाना हिच्यासाठी दिल्याचं महिमानं म्हटलंय. पण, आता मात्र पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी ती सज्ज झालीय.