`नीरजा`च्या कहाणीने मलालाही भारावली
लंडन : स्त्रीशिक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले सर्वस्व देणारी पाकिस्तानी नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिने नुकताच `नीरजा` चित्रपट पाहिला आहे.
लंडन : स्त्रीशिक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले सर्वस्व देणारी पाकिस्तानी नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिने नुकताच 'नीरजा' चित्रपट पाहिला आहे. चित्रपटाचे निर्माते असणाऱ्या अतुल कसबेकर यांनी यासंबंधी एक ट्वीट केले आहे.
पाकिस्तानच्या तालिबान्यांनी मलालाच्या डोक्यात गोळी घातली होती. तेव्हापासून ती लंडनमध्ये राहून मुलींच्या शिक्षणाच्या हक्काचा लढा देत आहे. लंडनमध्ये एका प्रायव्हेट स्क्रीनिंगमध्ये तिने हा चित्रपट पाहिला.
हा चित्रपट पाहिल्यावर 'मी भयापेक्षा जास्त कठोर आहे. पण, नीरजाला भयाने हिंमत दिली,' अशी प्रतिक्रिया तिने चित्रपटाची मुख्य अभिनेत्री सोनम कपूर हिच्याकडे व्यक्त केली.
एका विमान अपघातात शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या 'नीरजा' या २३ वर्षांच्या एअर हॉस्टेसच्या खऱ्या कहाणीवर हा चित्रपट आधारित आहे.