बहीण अर्पिताच्या बाळासोबत `सलमान मामाचा` हळवा क्षण
मुंबई : सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती झालंय. सलमान खानला लहान मुलांचीही प्रचंड आवड आहे. आता एखादं लहान बाळ त्याच्या घरातच आल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते सांगायलाच नको...

मंगळवारी सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने अहिल नावाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिचा दीर अतुल अग्निहोत्रीने ट्विटरवर या बाळाचा फोटो टाकून त्याची घोषणा केली. आता आपल्या बहिणीला बाळ झालंय म्हटल्यावर सलमान तरी कसा मागे राहील?
ही बातमी मिळताच हातातलं सगळं काम आटपून सलमानने थेट हॉस्पिटल गाठलं. आपल्या इवल्याश्या भाच्याला पाहून सलमान इतका भारावला की त्याने त्या बाळाचा एक गोंडस पापा घेतला. या हळव्या क्षणाचा एक फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.