मुंबई : ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातला आरोपी जय मुखी यानं त्याचं विधान मागे घेण्यासाठी  कोर्टासमोर अर्ज केलाय. पण या अर्जात त्यानं खळबळजनक दावे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे पोलीस मला अतिशय क्रूरपणे मारहाण करायचे, इलेक्ट्रिक शॉक द्यायचे, मला गुलामासारखी वागणूक देण्यात आली. तसंच माझ्या आई वडिलांचा छळ करण्यात आला, त्यामुळे दबावाखाली येऊन आपण विधान केल्याचं जय मुखीनं म्हंटलं आहे.


केनियात ड्रगतस्करीसंदर्भात झालेल्या एका बैठकीत ममता कुलकर्णी उपस्थित होती, असं जयनं याआधी पोलिसांना सांगितलं होतं. एफिड्रिन ड्रग प्रकरणात पोलिसांनी जय मुखीसह दहा जणांना अटक केली आहे. तर ममता कुलकर्णी, विकी गोस्वामींसह सात जणांना वॉण्टेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया ममता कुलकर्णीनं झी मीडियाला दिली आहे.