मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत जे नाही झालं ते यावेळेस होणार आहे. मनोज वाजपेयीचं नवं रुप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मनोज वाजपेयी आता एका समलिंगीच्या भूमिकेत दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीगड या सिनेमात मनोज वाजपेयी एका गे प्रोफेसरची भूमिका साकारणार आहे. पण या आधी त्याने त्याच्या कुटुंबियांकडे ही भूमिका करण्याबाबतची सहमती घेतली.
कुटुंबियांच्या सहमतीनंतरच मनोज वाजपेयीने ही भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे.


मनोज वाजपेयीने म्हटलं की, 'माझ्या कुटुंबियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या सहमतीनंतरच मी ही भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या पत्नीला देखील या भूमिकेबाबत सांगितलं होतं आणि तिला ही या भूमिकेबाबत काही अडचण नाही.'