मुंबई : झी मराठी वाहिनीवरील माझे पती सौभाग्यवती ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईंच्या मनातलं बाईलाच कळतं ही टॅगलाईन असलेली माझे पती सौभाग्यवती या मालिकेत वैभव मांगले मुख्य भूमिकेत होता. या मालिकेच्या जागी येत्या १८ जुलैपासून झी मराठीवर खुलता कळी खुलेना ही मालिका सुरु होतेय. 


या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच लॉंच झाला असून यात ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख हे कलाकार झळकले आहेत. काही नात्यांना नाव नसतं ही या मालिकेची टॅग लाईन असून याची कथा काय असेल याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.