मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित मराठी भाषेत डब केलेल्या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.


हिंदी चित्रपट मराठीत डब केल्याने मराठी चित्रपट सृष्टीला धोका आणि मोठे नुकसान होतं. हा चुकीचा पायंडा पडेल. प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपट निर्मितीला प्राधान्य ही त्या त्या राज्यांची भूमिका आहे असं देखील अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.