मुंबई : अभिनेता अभय देओल गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल करून चांगलाच चर्चेत आलाय. त्यालाच साथ देत आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोरं करण्याचा दावा करणाऱ्या एका क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं चक्क माफी मागितलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या करिअरच्या सुरुवातीला मॉडेल - अभिनेत्री सोनल सेहगल हिनं एका व्हिडिओमधून 'गोरेपणा' ठसवणाऱ्या कंपन्यांची पोलखोल केलीय... सोबतच तिनं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांची - ग्राहकांची माफीदेखील मागितली आहे. 


भारतात गोरेपणाची जाहिरात करणारी इंडस्ट्री जवळपास २०.५ अब्ज डॉलर्सची आहे.. या इंडस्ट्रीला आपल्या समाजाच्या दुय्यम दर्जाच्या मानसिकतेचीही मदत मिळते... असं सांगत अशा फेअरनेस क्रिमवर बंदी आणायला हवी, असं या व्हिडिओत म्हटलं गेलंय.