मुंबई : 'द जंगल बुक' या चित्रपटातील मोगली आता भारतात येणार आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात या चित्रपटातील मूळ भारतीय बाल कलाकार नील सेठी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वंशाचा असलेल्या १२ वर्षीय नील त्याच्या पालकांसोबत अमेरिकेतील न्यूयॉर्कला राहतो. या चित्रपटात तो एकमेव खरा मानवी कलाकार असणार आहे. यातील सर्व प्राणी अॅनिमेशन तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आले आहेत. त्याच्या या दौऱ्यादरम्यान तो मुंबईतील काही खास जागांना भेट देणार आहे. विशेष म्हणजे, भारतापासून तो त्याच्या या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुरुवात करणार आहे.


'माझे आजी आजोबा भारतात राहायचे. त्यांच्याकडून मी भारतातील जंगलांविषयी अनेक कथा ऐकल्या आहेत. माझ्या मूळ गावी येण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या पालकांना जेव्हा समजलं मी मोगलीची भूमिका साकारतोय तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण हे पात्र भारतीय आहे,' असं नील म्हणाला.


दिग्दर्शक जॉव फेवरू यांनी २००० मुलांच्या ऑडिशननंतर नीलची निवड केली. 'शेफ', 'आयर्न मॅन' 'द ऑफिस' अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. नीलमध्ये 'मोगली'त असणारे सर्व गुण असल्यानेच त्याची निवड करण्यात आल्याचे जॉन यांनी सांगितलं.


८ एप्रिल रोजी 'द जंगल बुक' जगभरात प्रसिद्ध होईल. भारतीयांचा लाडका मोगली त्यांना किती पसंत पडतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.