बॉक्स ऑफिसवर धोनी सुस्साट
मैदानावर उतरल्यानंतर भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्यापद्धतीने धुंवाधार बॅटिंग करतो त्याचप्रमाणे धोनीचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुस्साट कमाई करतोय.
मुंबई : मैदानावर उतरल्यानंतर भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्यापद्धतीने धुंवाधार बॅटिंग करतो त्याचप्रमाणे धोनीचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुस्साट कमाई करतोय.
पहिल्या तीन दिवसांत या सिनेमाने तब्बल 66 कोटींची कमाई केलीये. प्रदर्शित झालेल्या दिवशी या सिनेमाने 21.30 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.60 कोटी तर सुट्टीच्या दिवशी रविवारी या सिनेमाने 24.10 कोटींची कमाई केली.
धोनीच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा या सिनेमात करण्यात आलाय. भारताचा कर्णधार धोनी सगळ्यांनाच माहीत आहे मात्र हा धोनी घडला कसा हे नीरज पांडे यानी रुपेरी पडद्यावरुन दाखवलेय.
धोनीचे क्रिकेटमधील पदार्पण, त्याचे कुटुंब, त्याची लव्हस्टोरी, साक्षीशी लग्न ते 2011 पर्यंतचा वर्ल्डकप जिंकण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात अधोरेखित करण्यात आलाय.