मुंबई : अमिताभ बच्चन, शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बॉबी आणि वहीदा रहमान यांच्या 'नमक हलाल' या सिनेमाला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे २१ मेला हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.


१९८२ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाचे निर्माते स्पेशल स्क्रीनिंग करणार आहेत. त्यासाठी वीकेएएओ (थिएटर ऑन डिमांड सर्विस) आणि शेमारू एंटरटेनमेंट एकत्र आले आहेत. या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री परवीन बॉबी आणि स्मिता पाटील या दोन्ही ही आता या जगात नाहीत.