मुंबई : नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. आगामी 'बर्नी' या सिनेमातून त्यांचं पुनरागमन होणार आहे. २८ वर्षानंतर नीलकांती हे सिनेमामध्ये काम करतायंत. यापूर्वी त्यांनी मालिकांमध्ये काम केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलिमा लोणारी दिग्दर्शित बर्नी चित्रपटात नीलकांती पाटेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'बर्नी' हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रदर्शित होणार आहे.