मुंबई: मी नथुराम गो़डसे बोलतोय, हे नाटक आपल्या पहिल्या प्रयोगापासूनच वादात राहिले. नाटकाविरोधात आंदोलनं, न्यायालयीन खटलेही मोठ्याप्रमाणावर झाले. असं असतानाही या नाटकाचे 817 प्रयोग झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता मात्र या नाटकाचे निर्माते आणि नथुरामचा अभिनय करणारे शरद पोंक्षे यांच्यात वाद झाला आहे. या वादामुळे नाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हे नाटक हजार प्रयोगांचा टप्पा गाठत असताना विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात प्रयोग व्हावेत अशी भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांची होती, पण नाट्य निर्मात्यांना हे मान्य नव्हतं, त्यामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आले.