मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता सोहेल खानच्या एका आगामी चित्रपटात मुख्य भूमिका करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात तो एका गोल्फ खेळाडूची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या भूमिकेबद्दल जास्त माहिती मिळू शकलेली नाही. चित्रपटासाठी त्याने होकार दिल्यावर आता स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.


सध्या सिद्दीकी शाहरुख खानच्या 'रईस'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. यापूर्वी सिद्दीकीने सोहेलचा भाऊ सलमान खानच्या 'किक' मध्ये खलनायकाची भूमिका केली आहे आणि तसेच सलमानच्याच 'बजरंगी भाईजान' मध्येही त्याची पत्रकाराची भूमिका गाजली होती.