मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच, संजय दत्तच्या घरात एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. मोठ्या आवाजातील गाणी यावेळी सुरू होती. रात्रीचे दोन वाजले तरी गाणी आणि दंगा सुरूच होता. 


त्यामुळे, वैतागलेल्या शेजाऱ्यांनी अखेर पोलिसांचा धावा केला. त्यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळातच पोलीस संजयच्या घरी दाखल झाले. 


परंतु, उल्लेखनीय बाब म्हणजे यानंतरही संजयच्या घरातून पहाटे ४ वाजेपर्यंत आवाज सुरूच होता. त्यामुळे 'मुन्नाभाई'चे शेजारी मात्र त्याच्यावर चिडलेलेच आहेत.