मुंबई : कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे. या कार्यालयाचं बांधकाम करताना कपील शर्मानं अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनधिकृत बांधकाम तोडल्याचा राग कपिल शर्मा बीएमसी कर्मचा-यांवर काढून स्वत:ची कातडी वाचवत आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कपील शर्माने वर्सोवा इथल्या बंगल्याच्या मागे अनधिकृत बांधकाम केलं होतं. त्याला 26 जुलैला बीएमसीनं स्टॉप वर्क नोटीस दिली होती. नंतर 4 ऑगस्टला बांधकामही पाडले होतं. कपीलनं तिवरांच्या जागेवर भराव टाकून सुमारे 1000 चौरस फुटाचे बांधकाम केलं असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे याच्या राग आल्याने कपिल शर्माने हा खटाटोप केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.