मुंबई : वर्ष 2017 या नव्या वर्षात अभिनेत्री क्रांती रेडकरने एक खास संकल्प केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांती नव्या वर्षात लग्न करणार आहे. 2016 मध्ये अनेक कलाकारांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतलाय. हे पाहून की काय क्रांतीही आता लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी आतूर झालीय. 


खुद्द क्रांतीनेच 'झी 24 तास'शी बोलताना आपला हा नवा संकल्प शेअर केलाय. त्यामुळे आता क्रांतीचा लाईफ पार्टनर नेमका कोण असणार? याचीच आता सगळ्यांना उत्सुकता लागलीय. 


दरम्यान, नुकतीच क्रांती 'करार' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलीय. क्रांतीसोबत या सिनेमात सुबोध भावे आणि उर्मिला कानेटकर हे देखील या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं क्रांती आणि उर्मिला प्रथमच एकत्र काम करतायत. इमोशन, ड्रामा असे एलिमेन्ट्स असलेल्या करार या सिनेमाचं दिग्दर्शन मनोज कोटियन यांनी केलंय.