मुंबई : इरफान आणि आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेलरमध्ये, आपल्या चिमुरड्यांसाठी जसे इतर आई-बाबा चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतात, तसाच काहीसा प्रयत्न इरफान-सबा त्यांच्या चिमुरडीसाठी करताना दिसतात. इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलीनं शिक्षण घ्यावं, जेणेकरून भविष्यात तिला अडचणीला सामोरं जावं लागणार नाही, असं या चिमुरडीच्या आईची धारणा आहे... आणि मग सुरू होतो एका इंग्रजी शाळेत अॅडमिशन मिळवण्याचा प्रयत्न... 


आता त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो की नाही हे सिनेमा पाहिल्यानंरच लक्षात येईल... 


पाहा, याच सिनेमाचा हा ट्रेलर...