मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पद्मावतीचे शूटिंग पुन्हा एकदा थांबलेय. यावेळी पद्मावतीचे शूटिंग कोणाच्या विरोधामुळे नव्हे तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी दीपिका पदुकोणमुळे थांबलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं सांगितलं जातंय की दीपिकाच्या मानेला छोटीशी दुखापत झाल्याने तिला शूटिंग करता येणार नाहीये. याप्रकरणी दीपिकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होत असून ती लवकरच शूटिंग सुरु करेल. 


याआधीही अनेकदा पद्मावतीला झालेल्या विरोधामुळे सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. सिनेमाच्या सेटलाही आग लावण्यात आली होती.