`दबंग ३`च्या हिरोईनने पब्लिसिटीसाठी लीक केले टॉपलेस फोटो?
सलमान खानचा सुपरहिट चित्रपट दबंगचा तिसरा पार्ट म्हणजेच दबंग ३साठी तयारी सुरु झालीये.
मुंबई : सलमान खानचा सुपरहिट चित्रपट' दबंग'चा तिसरा पार्ट म्हणजेच 'दबंग ३'साठी तयारी सुरु झालीये. असंही बोललं जातय की लंडनची अभिनेत्री पर्ल राह 'दबंग ३'मध्ये सलमानसोबत काम करणार आहे. नुकतीच पर्लचे काही टॉपलेस फोटो समोर आले होते. पब्लिसिटीसाठी हे फोटो पर्लनेच मीडियामध्ये लीक केले होते असं सांगण्यात येतंय.
इंग्रजी वेबसाईट बॉलीवूड लाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी एक प्रेस रिलीजसोबत काही टॉपलेस फोटो आले. या फोटोत पर्ल टॉपलेस होऊन पोझ देत होती. प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलं होतं की पर्ल सलमानची मैत्रीण आहे. त्यांची अनेकदा भेटही झालीये. मात्र असं काही नाहीये. या सर्व अफवा आहेत.
सलमानशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 'दबंग ३' मध्ये कोणती अभिनेत्री असणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पर्लला अद्याप चित्रपटासाठी करारबद्ध केलेले नाही. सलमान खान तिला ओळखतही नाही. ती फक्त सलमानसोबत नाव जोडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतेय.