मुंबई : इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकवेळा माझी खिल्ली उडवली गेल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगाना रणावतनं केलं आहे. हिमाचल सारख्या राज्यातून मी बॉलीवूडमध्ये आले, याची मला अजिबात लाज वाटत नसल्याचं कंगना म्हणाली आहे. माझ्याविषयी जे वाईट बोलतात त्यांना मी त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याचा टोलाही कंगनानं लगावला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला प्रत्येक वेळी लोकांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला, परंतू माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मी नेहमी स्वत:वर विश्वास ठेवत आले आहे. आजही लोक माझ काम बघून किती सुंदर मुलगी अस म्हणतात, पण माझं काम झाल की मी सगळ विसरून जाते, अशी खंतही कंगनानं व्यक्त केली आहे.

समान हक्क मिळवण्याकरिता स्त्रियांना आधी स्वत:वर विश्वास हवा त्यानंतरच त्यांना समाजातून तशी वागणूक मिळेल. आज स्त्री कोणालाही न घाबरता आपले मत समाजापूढे मांडतेय आणि लोकही तिला ऐकण्यासाठी तितकेच उत्सुक असतात ही खरं धैर्य देणारी बाब आहे. एक कलाकार म्हणून समाजात आजूबाजूला काय चाललेय याबाबत जागरूक राहायला हवे असे कंगनाचे मत आहे.