कान : ऐश्वर्या राय बच्चननं २०१७ कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सिन्ड्रेला लूकमध्ये हजेरी लावली... आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायकल सिनकोनं डिझाईन केलेल्या निळ्या रंगाच्या ब्रोकेड बॉल गाऊनमध्ये ४३ वर्षीय ऐश्वर्या एकदम शाही अंदाजात दिसली. 



डार्क रंगाची लिपस्टिक, साधा मेक अप, खुले सोडलेले केस आणि कोणत्याही दागिन्यांशिवाय तिचा हा लूक खूपच मोहक वाटत होता. 



रेड कार्पेटवर सगळ्यांना 'नमस्ते' करत ऐश्वर्यानं अनेकांची मनं जिंकली.