मुंबई : हॉलीवूड काय किंवा बॉलीवूड काय थलाईवा रजनीकांतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याच्यापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही. आतापर्यंत तुम्ही रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेनमध्ये सिनेमांचं प्रमोशनल पोस्टर बघितलं आहे, मात्र पहिल्यांदाच विमानावर सिनेमाचं प्रमोशनल पोस्टर लावण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जुलैला रजनीकांतचा तामिळ सिनेमा कबली प्रदर्शित होतो आहे, आणि यासाठीच एअर एशियाने रजनीच्या फॅन्ससाठी खास बॅंगलोर टु चेन्नई रिटन्स फ्लाईट सुरु केली आहे.


या फ्लाईटचं पॅकेज 7860 रुपये असणार आहे ज्यामध्ये बॅंगलोर टु चेन्नई रिटर्न फ्लाईट तिकीट, फर्स्ट डे फर्स्ट शो मुव्ही तिकीट, ऑडिओ सीडी, कबाली मर्चंनडाईझ ब्रेकफास्ट, लंच आणि नाश्ता यांचा समावेश आहे.


समीक्षकांच्या मते हा तामिळ सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडेल. या सिनेमाने 200 कोटींची कमाई प्रदर्शनाच्या आधीच केली आहे. तसंच या सिनेमाच्या ट्रेलरला केवळ 2 महिन्यांमध्ये 2 करोड तीस लाख पेक्षा जास्त व्ह्यूस मिळाले आहेत, त्यामुळे यावरुनच रजनीकांत नावाच्या वादळाची प्रचिती येते. आताच ही परिस्थिती आहे तर बॉक्स ऑफिसवर कबालीने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली तर नवल वाटायला नको.