मुंबई : बाहुबली सिनेमामुळे बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेला अभिनेता प्रभास  आता 'बाहुबली टू'ची तयारी करतोय. मात्र यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, या चित्रपटासाठी प्रभाष स्वत:चं वजन तब्बल दीडशे किलो करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासचं पहिल्या सिनेमात १२० किलो वजन होतं, जिममध्ये जाऊन त्याने आता १३० किलो वजन केलं आहे, आता तो आणखी २० किलो वजन वाढवणार आहे.


वजन वाढवण्यासाठी प्रभासला जिममध्ये दोन ट्रेनर आहेत. जिम कसरत करायला त्याला महिना झाला असेल, आणखी महिन्याभरात त्याला २० किलो वजन वाढवायचं आहे.


प्रभास  जिममध्ये दररोज पाच तास कसरत करतो, यात ५० अड्यांचा पांढरा भाग, अर्धा किलो चिकन, सलाद आणि फळं तसेच ब्राऊन राईसचाही समावेश आहे.


प्रभासच्या खांद्याची मागील वर्षी सर्जरी झाली होती. तेव्हा त्याला सहा महिने जड वजन न उचलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यामुळे बाहुबली पार्ट वनला रिलीज होण्यास उशीरही झाला होता, कारण चित्रपटाचं शुटिंग काही दिवस खोळंबलं होतं.