मुंबई : 'जुळून येती रेशीमगाठी' या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मेघना अर्थात प्राजक्त माळी लवकरच रंगभूमीवर पदार्पण करतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील प्रसिद्ध चेहरे नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर दिसू लागलेत. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुयश टिळक, सुरुची अडारकर, ललित प्रभाकर यांच्यामध्ये आता प्राजक्ताच्या नावाचाही समावेश झालाय. 


लवकरच प्राजक्ता प्लेझंट सरप्राइज या नाटकात दिसणार आहे. सुयोग नाट्यसंस्था या नाटकाची निर्मिती करतेय. या नाटकात प्राजक्तासह मयुरी देशमुख, समीर खांडेकर आणि सौरभ गोखले या कलाकारांचा समावेश आहे. प्रेमावर आधारित या नाटकाची कथा आहे. लवकरच हे नाटकं रंगभूमीवर येणार आहे.