मी पूर्णपणे सुखरुप आहे- प्रथमेश परब
टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत.
मुंबई : टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत.
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर गेल्या दोन तीन दिवसांपासून त्याचा अपघात झाल्याची बातमी फिरतेय. या बातमीमुळे प्रथमेशच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र प्रथमेश परबने स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकून ही अफवा असल्याचे म्हटलेय. मित्रांनो मला कोणताही अपघात झालेला नाही. मी सुखरुप असल्याचे प्रथमेशने पोस्टमध्ये म्हटलंय.
काळजी करू नका मित्रांनो मी सुखरूप आहे आणि माझ कोणत्याही प्रकारच accident झालेलं नाही :) हा video जास्तिस्त जास्त करा ...Prathamesh Parab
Posted by Prathamesh Parab on Saturday, April 9, 2016