नवी दिल्ली : बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवतेय. क्वांटिकोमध्ये तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. त्यानंतर ऑस्करमध्येही पुरस्कार प्रदान करण्याची तिला संधी मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलीवूडमध्ये सुस्साट सुटलेली प्रियंका आता लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बेवॉच'मध्ये ती काम करत आहे. या चित्रपटातील तिचा नुकताच फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात प्रियंकासह ड्वायेन जॉन्सन, झॅक इफ्रॉन दिसणार आहेत.