मुंबई : अखेर, प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळालीच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपली ओळख बनवणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोपडानं या आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये करस्पॉन्डन्ट डिनरमध्ये सहभाग घेतला. यावेळी ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबतही दिसली. 


आपला हा आनंद प्रियांकानं सोशल बेवसाईटवर जाहीर केलाय. गंमतीशीर आणि चार्मिंग बराक ओबामा यांना भेटून खूप आनंद झाल्याचं प्रियांकानं यावेळी म्हटलंय. यावेळी, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती.  


या कार्यक्रमात विल स्मिथ, जाडा पिनकेट स्मिथ, केरी वॉशिंग्टन, शोंडा राइम्स, किम करदाशियाची बहिण मॉडल केंडल जेनर यांच्यासहीत अनेक हॉलीवूड कलाकार उपस्थित होते.