मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जखमी झाली आहे, प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून तसं वाटतंय. प्रियांकाचा  आगामी हॉलिवूडपट 'बेवॉच'च्या सेटवर ती जखमी झाल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका 'बेवॉच' चित्रपटात व्हिक्टोरिया नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. फोटोमध्ये प्रियांकाने फर्स्ट एड किट आणि काही औषधे दाखवली आहेत. कामावर असताना झालेल्या दुखापतींचा उपचार, असं खाली लिहिलं आहे.


 'बेवॉच' सिनेमा 90 च्या दशकात हिट झालेल्या या टीव्ही सीरिजवर हा चित्रपट आधारित आहे.