मुंबई : हॉ़लिवूड - बॉलिवूड गाजवणारी प्रियांका निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी करतेय... आता ती आणखी एक बंगाली - मराठी (संमिश्र भाषा) सिनेमा घेऊन येतेय... हा सिनेमा नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथा टागोर यांच्या जीवनातील प्रेमकहाणीवर आधारित असेल, असं सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठीत 'व्हेंटिलेटर', भोजपुरीत 'बम बम बोल रहा है काशी', पंजबीत 'सरवन', सिक्किममध्ये 'पहुना' आणि गोवन भाषेत बनलेली 'लिटिल जो' यानंतर आता प्रोड्युसर प्रियांकानं 'नलिनी' सिनेमा हाती घेतलाय... हाच सिनेमा हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
 
नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर १८७८ साली १७ वर्षांचे असताना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या मुंबईस्थित घरात राहत होते. तर्खडकर यांची २० वर्षांची मुलगी अन्नपूर्णा हिच्याशी त्यांची याच दरम्यान ओळख झाली. 


अन्नपूर्णा तेव्हा नुकतीच इंग्लंडहून भारतात परतली होती. इंग्रजीमध्ये निपुण असलेली अन्नपूर्णी रविंद्रनाथ यांची शिक्षिका बनली... आणि याच दरम्यान या दोघांमध्ये जवळिक निर्माण झाली. अन्नपूर्णा यांच्या म्हणण्यानुसार, रविंद्रनाथ यांनी तिला नलिनी नाव ठेवलं... आणि आपल्या कवितांमध्ये त्यांनी तिला याच नावानं जिवंतही केलं. 


टागोर यांच्या वडिलांचा मात्र या प्रेमाला विरोध होता... त्यामुळे या दोघांचं भेटणंही कठिण झालं. १९८८० मध्ये अन्नपूर्णानं स्कॉटलंडचा रहिवासी हेरॉल्डशी विवाह केला... आणि ते दोघेही इंग्लंडला निघून गेले. 


हीच हळुवार प्रेमकहाणी चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक उज्ज्वल चॅटर्जी हा सिनेमा दिग्दर्शिक करणार आहेत. तर त्यांची पत्नी सागरिका यांनी या सिनेमाची कथा लिहिलीय. सध्या या सिनेमाच्या कास्टिंगवर काम सुरू आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.