मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही लवकरच अमेरिकेत स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आता प्रियंका बी-टाऊनच्या कार्यक्रमांमध्ये जास्त दिसत नाही.


प्रियंकाने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मध्यंतरी प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटानंतर प्रियंका जास्त वेळ भारताबाहेरच व्यतीत करतेय.


'क्वांटिको २' या मालिकेच्या कामात सध्या ती व्यस्त आहे. जुलै महिन्यात या मालिकेच्या कामासाठी लॉस एन्जेलिसला गेलेली प्रियंका पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये येणार असल्याची चिन्हं आहेत.


या मालिकेच्या दुसऱ्या पर्वासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'क्वांटिको २' च्या येणाऱ्या काही पर्वांसाठी येत्या पाच वर्षांसाठी प्रियंका अमेरिकेतील लॉस एन्जेलिसला राहणार असल्याचं एका इंग्रजी मासिकाच्या वृत्तानुसार समजले आहे.


भारतात 'देसी गर्ल' आणि काशीबाई यांसारख्या भूमिकांना न्याय देणाऱ्या प्रियंका चोप्राने भारताबाहेरसुध्दा आपल्या अभिनयाचा जम बसवला आहे.


'क्वांटिको २' मालिकेनंतर प्रियंका 'बेवॉच' या हॉलीवूड सिनेमात एक भूमिकाही साकारणार आहे.