मुल्तान : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या झालीये. मुल्तानमध्ये कंदीलचा भाऊ गफूरनेच तिची हत्या केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोळी झाडून कंदीलचा खून करण्यात आलाय. हत्येनंतर आरोपी गफूर फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गफूर कंदीलला भेटायला तिच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने हे कृत्य केले.


गेल्या अनेक महिन्यांपासून कंदील ट्विटरवर बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत होती. नुकतेच तिने एक गाणे ट्विटरवर पोस्ट केले होते. 


तसेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीबाबतही तिने ट्विटरवर तिचे प्रेम जाहीर केले होते. यानंतर ती अधिकच चर्चेत आली होती.