कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं
अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं.
नवी दिल्ली : अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं.
या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करण्यात आलं होतं. अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळाल्यापासून अनेक पाकिस्तानी कलाकरांनी भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा केल्य़ानंतर कंदील प्रसिद्धीला आली होती.
पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे हत्या करण्यात आली आहे. कंदील हिच्या भावानेच ही हत्या केली आहे. पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे.