नवी दिल्ली : 'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कबाली' या सिनेमात रजनीकांत एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत... त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत राधिका आपटे दिसणार आहे.


नुकतीच, राधिका या सिनेमाच्या शुटींगसाठी मलेशियामध्ये दाखल झालीय. रजनीकांत यांचं केवळ निरीक्षण करून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असल्याचं तिनं म्हटलंय.  


गँगस्टर कबालीश्वरणच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमात धनशिका, दिनेश कलायरसन आणि रित्विका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मे २०१६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय.