मुंबई : प्रत्युषा आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगने खळबळजनक खुलासा केलाय. राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी प्रत्युषाने आत्महत्या केली त्या दिवशी त्याचे आणि प्रत्युषाचे भांडण झाले होते. मात्र भांडण कशामुळे झाले हे राहुलने सांगितले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, गुरुवारी रात्री राहुल प्रत्युषा आणि त्याच्या आणखी एका मैत्रिणीसोबत गोरेगावमधील फ्लॅटवर गेले होते. तिथे तिघांनी ड्रिंक केली होती. त्यानंतर राहुल आणि त्याची मैत्रिण माऊंट मेरी चर्चमध्ये गेले. पहाटे चारच्या सुमारास राहुल परतला आणि तो झोपण्यासाठी गेला. 


मात्र सकाळ होताच प्रत्युषा आणि राहुलमध्ये भांडण सुरु झाले. यादरम्यान प्रत्युषानेही ड्रिंक केली. राहुलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काहीच ऐकले नाही. 


राहुलच्या मते तो दुपारी एकच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर निघून गेला. एका तासानंतर त्याने प्रत्युषाला फोन केला. सुरुवातीला तिने अनेकदा त्याचा फोन घेणे टाळले. अखेर जेव्हा प्रत्युषाने फोन उचलला तेव्हा लंचबद्दल विचारले मात्र तिने त्यालाही नकार दिला. 


काही वेळानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र न उघडल्याने त्याने शेजारच्या नोकराची मदत घेतली. राहुल जेव्हा बाल्कनीमधून घराचा दरवाजा उघडला तेव्हा प्रत्युषाने गळफास लावून घेतल्याचे पाहिले.


हे पाहून राहुलने तातडीने त्याच्या अंकलला तसेच तिच्या घरच्यांना फोन केला आणि तिलो कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.