चेन्नई : 1996च्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मी जयललितांवर टीका केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं वक्तव्य सुपरस्टार रजनीकांतनं केलं आहे. माझ्या टीकेमुळे जयललिता तणावत होत्या. तेव्हाच्या एआयडीएमके सरकारवर मी केलेली टीका ही पक्षाच्या पराभवाचं मुख्य कारण असल्याचं रजनीकांत म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआयडीएमके पुन्हा सत्तेत आलं तर देवही तामीळनाडूला वाचवू शकत नाही, असं 1996मध्ये रजनीकांत म्हणाला होता. यानंतर 1996च्या निवडणुकीत विरोधात असलेल्या डीएमकेला सत्ता मिळाली होती. 


रजनीकांतनं जयललितांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा उल्लेख कोहीनूर हिरा असा केला. पुरुष प्रधान समाजामध्ये जयललितांनी स्वत:चा मार्ग तयार केला, अशी प्रतिक्रिया रजनीकांतनं दिली आहे. 


आमच्यामध्ये असलेल्या विरोधानंतरही जयललिता माझ्या मुलीच्या लग्नाला आल्या होत्या. मी हिम्मत दाखवून त्यांना मुलीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्या लग्नाला येणार नाहीत, असं मला वाटलं होतं. पण सगळ्या जुन्या गोष्टी विसरून त्या आल्या, असं सांगत रजनीकांतनं अम्मांच्या आठवणींना उजाळा दिला.