मुंबई : सिने दिग्ददर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई सीरीजचा तिसरा सिनेमा 'मुन्नाभाई ३' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात संजय दत्त आणि अरशद वारसी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. हिरानी सध्या रणबीर कपूरसोबत संजय दत्तच्या बायोपिकवर काम करत आहे. या सिनेमाची शूटिंग जूनपर्यंत संपणार आहे. हा सिनेमा ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार असल्याचं बोललं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तची बायोपिक रिलीज झाल्यानंतर हिरानी 'मुन्नाभाई 3' बनवणार आहेत. मुन्नाभाई सीरीजचा पहिला सिनेमा डिसेंबर २००३ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तीन वर्षानंतर २००६ मध्ये लगे रहो मुन्ना भाई रिलीज झाला होता. तिसऱ्या सिनेमाची घोषणा हिरानी यांनी आधीच केली होती पण सिनेमा कधी बनणार याबाबत काही माहिती नव्हती. 


एका वृत्तपत्राला हिरानी यांनी सांगितलं की, मुन्नाभाई ३ साठी त्यांच्याकडे ५ स्क्रिप्ट आहेत.