मुंबई : रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शनसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडेल तसेच सलमानच्या सुलतानलाही बॉक्स ऑफिसवर धोबी पछा़ड देईल असा अंदाज लावला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा सुलतान हा सिनेमा दोन आठवडयांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. पण आता सुलतानला टक्कर देण्यासाठी कबाली येतोय.. सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित कबाली चित्रपट सुलतानला बॉक्स ऑफिसवर मात देण्यासाठी सज्ज झाला आहे.


अमेरिकेत दोन तासांत शो हाऊसफुल्ल


अमेरिकेत ४०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणाऱ्या रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाची सर्व तिकीटे तेथे अवघ्या दोन तासांत विकली गेली. भारतातही याहून काही वेगळी परिस्थिती नाही. चेन्नईमध्ये चित्रपटाच्या तिकीटांसाठी मोठी मागणी आहे. ऑनलाईनही कबालीच्या तिकीटांसाठी बरीच मागणी आहे. 


चाहते किंमत मोजायला तयार


तामिळनाडू सरकारच्या आदेशानुसार या शहरात चित्रपटाची तिकीटे केवळ १२० रुपयांत विकली जात आहेत. तर शेजारील कर्नाटक आणि केरला या शहरांत तिकीटांची किंमत ६०० रुपये इतकी आहे. पण रजनीकांत यांचा चित्रपट असल्यामुळे चाहते तिकीटासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार झालेत. 


तीन दिवसांत २०० कोटी कमावणार?


फॅन्समध्येही कबालीबद्दल जबरदस्त क्रेझ बघायला मिळते आहे. हा चित्रपट पाहता यावा याकरता, चेन्नई आणि बंगळुरुतल्या अनेक कंपन्यांनी २२ जुलैला आपल्या कर्मचाऱ्यांना सु्ट्टी जाहीर केली आहे. दक्षिणेतला मेगा सुपरस्टार रजनीकांत याच्या नव्यानं झळकणाऱ्या चित्रपटाचं आकर्षण, चित्रपट रसिकांमध्ये विशेष करुन असतं. या पार्श्वभूमीवर चेन्नई तसंच बंगळुरुतल्या विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी २२ तारखेला सुट्टीच जाहीर करुन टाकलीय. कबालीचे निर्माता कलइपुली थानु यांनी हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांत २०० कोटी कमवेल असं म्हटलंय. 


'सुल्तान'ला मोडीत काढणार?


सलमान आणि अनुष्काची प्रमुख भूमिका असलेल्या सुल्तानने आतापर्यंत ३४० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे कबाली हा रेकॉर्ड तोडणार असं दिसतयं. रजनीकांत आणि सलमान हे दोघेही सुपरस्टार असल्याने त्यांच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस युद्ध बघण्यासारखे असेल. त्यामुळे कबाली सुल्तानवर किती मोठी मात देतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.