मुंबई : दिग्दर्शक रामगोपाल वर्मा त्याच्या वादग्रस्त ट्विटबद्दल नेहमीच चर्चेत असतो. यावेळी रामूनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामूनं अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांचा संसदेमधला हसतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये  या तिघांच्या पुढे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बसल्या आहेत.


या तीन व्यक्ती कोण आहेत ते मला माहिती नाही, पण पण ते पुढे बसलेल्या महिलेबद्दल वाईट जोक करून हसत आहेत. हा फोटो भारतीय पुरुषांची महिलेबद्दल असलेली मानसिकता दाखवतो. बॅक बेंचर्स हे नेहमीच वाईट असतात मग ते शाळेतले असोत किंवा संसदेतले. अशी आक्षेपार्ह ट्विट रामूनं केली आहेत.