मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकर नुकतीच विवाहबंधनात अडकली. काश्मीरचा बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्याशी ती विवाहबंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या विवाहानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलीवूड निर्माते राम गोपाल वर्मानेही उर्मिलाला तिच्या भावी आयुष्याबद्दल ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्यात. तिची लाईफ रंगीला राहावी असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. 


उर्मिलाचे आणि राम गोपाल वर्मा यांच्यात जवळीक असल्याच्या चर्चांना एकेकाळी चांगलाच ऊत आला होता. वर्मा यांनी उर्मिलाला रंगीला, मस्त,कौन,सत्या या चित्रपटात काम दिलं होतं.